Saturday, May 4, 2024
Homeनगरचोरांची नजर आता गाढवांवर!

चोरांची नजर आता गाढवांवर!

बेलापुर | प्रतिनिधी

मोटारसायकल चोर्‍या, गंठण चोर्‍या, लिंबू चोऱ्या, वाळू तस्करी अशा अनेक चोर्‍या होत असताना आता गाढवांच्याही चोर्‍या होऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

बेलापूर गावातील ५६ हजार रुपये किमतीची आठ गाढव चोरीला गेली असुन या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, बेलापुर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हा माती वाहतूक करत असुन या कामाकरीता त्याच्याकडे चार गाढव होती. त्याला पाथरे येथील माती वहातुक करण्याचे काम मिळाल्यामुळे आठ गाढव घेवुन रविंद्र बोरुडे हा पाथरे ता .राहुरी येथे गेला होता. दिनांक १६ मार्च रोजी माती वहातुक केल्यानंतर रविंद्र बोरुडे याने आठही गाढंव पायाला दोरी बांधुन गावातील मंदिरासमोर बांधली व चार वाजता बेलापुरला घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामाकरीता पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढंव आढळून आली नाही. कुणीतरी सोडून दिली असतील अशा समजुतीने रविंद्र बोरुडे याने पुर्ण परिसर पिंजुन काढला. परंतु गाढंव आढळून आली नाही. त्यामुळे त्याने पोलीसात तक्रार दाखल केली.

पोलीसांनी रविंद्र बोरुडे याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला. या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढव पंढरपूर येथे असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी आठ गाढवं व तेथील गाढवं विकत घेणारा अहीनीनाथ जाधव यास ताब्यात घेतले. त्यानंतर बेलापुरातुन ज्याने गाढव विकली तो अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे व ज्या गाडीत गाढवं भरुन नेली तो टेम्पो चालक जमशेद पठाण रा बेलापुर यास ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या