Monday, May 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"लाडकी बहिण योजनेला जोडणे बंद करा, नाही तर तुम्हाला…"; मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आमदाराला...

“लाडकी बहिण योजनेला जोडणे बंद करा, नाही तर तुम्हाला…”; मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आमदाराला भर सभागृहात खडेबोल सुनावले

नागपूर | Nagpur
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पण मंगळवारी सभागृहात एक वेगळे चित्र पहायला मिळाले. मंगळवारी याच मुद्द्यावरुन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे चिडल्याचे दिसून आले. त्यांनी या मुद्द्यावरुन त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल, असे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सर्वांदेखत सुनावले.

तर तुम्हाला घरी बसावं लागेल…
राज्यातील प्रत्येक समस्येला लाडकी बहिण योजनेशी जोडणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असून ती कोणीही बंद करू शकणार नाही. “तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर लाडकी बहिण योजनेला जोडणे बंद करा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल.”, असा इशाराही त्यांनी यावेळी सदस्यांना दिला.

- Advertisement -

अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या भागातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडला. यावेळी त्यांनी म्हटले की, लाडक्या बहि‍णींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारु ही आहे. आमच्या महिला भगिनी अवैध दारुविक्रीबाबत विचारणा करतात. आपल्या लाडक्या बहि‍णींचे हे दु:ख आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर गृह विभाग, अन्न औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले.

“दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, निर्देश दिले तरी काही होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे वारंवार सगळ्या विषयांचा संबंध लाडक्या बहिणीशी जोडला जात असल्याने काहीसे चिडले. त्यांनी म्हटले की, अध्यक्ष महोदय मी पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा घरी बसावे लागेल. लाडक्या बहि‍णींचे पैसे सुरु राहतील, ही योजना बंद होणार नाही. त्या योजनेची तुलना दुसऱ्या योजनेशी करता येत नाही, हे लक्षात ठेवा. विधानसभा अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : पहिल्या दिवशी पाटी कोरीच; आमदाराच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय...