धुळे dhule । प्रतिनिधी
तालुक्यातील बिलाडी गावात हळदीच्या कार्यक्रमानिमित्त (Turmeric programs) घरासमोर पाहुणे मंडळी जमले असता रस्त्यावरून दुचाकीने जाणार्या तरूणांनी (youth) त्यांच्या दुचाकीचा हॉर्न (Bike horn) वाजविला. त्यांना हॉर्न वाजवू नका, (Don’t honk) असे समजावून सांगितले असता राग आलेल्या चौघांनी जमलेल्या पाहुण्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण (brutal beating) केली. या मारहाणीत एका महिलेचा (woman’s) विनयभंग (molestation)करण्यात आला.
सभापती राष्ट्रवादीचा की ठाकरे गटाचा? नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 1 मे रोजी तालुक्यातील बिलाडी गावात त्यांच्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक घरासमोरील रस्त्यावर जमले होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास एम.एच.18/एजे 9516 क्रमांकाच्या दुचाकीवरून चौघे जात होते. तेव्हा अंगणातील मंडळी बाजुला होण्यासाठी दुचाकीस्वाराने जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरूवात केली.
भाजपात दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष नेमले जाणार! VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…
त्यास हळदीचा कार्यक्रम सुरू असून तु दुसर्या गल्लीतून तुझे वाहन ने, मोठ्याने हॉर्न वाजवू नको असे सांगितले. याचा राग आलेल्या चौघांनी मुरलीधर साहेबराव पाटील, गोकुळ साहेबराव पाटील, विजय मुरलीधर पाटील, मनिष गोकुळ पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी नातेवाईकांसह मध्यस्थी करण्यास गेले असता मुकेश कैलास मोरे, भरत विठ्ठल मोरे यांनी महिला नातेवाईकांना अश्लिल शिवीगाळ केली. त्यामुळे वाद विकोपाला गेला.
मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळखकुटुंबिय लग्नाला गेले अन् तरुणाने विष प्राशन करुन संपविली जीवनयात्रानेर नजीक गोरक्षकांनी उघड केली गोवंशाची अवैध वाहतूक
यात मुकेश मोरे व भरत मोरे यांनी पीडितेचा विनयभंग केला. तसेच या झटापटीत गळ्यातील मंगळसुत्र तुटून गहाळ झाले. तेथून निघताना वरील चौघांनी पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या