Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यास्वत:ला व्यक्त करण्याची संधी सोडू नका

स्वत:ला व्यक्त करण्याची संधी सोडू नका

नाशिक कुसूमाग्रजनगरी । दि.4 टीम देशदूत Nashik/ Kusumagraj Nagari | Team Deshdoot

- Advertisement -

प्रत्येकात एक सुप्त कला लपलेली असते There is a hidden art hidden in each. . कुणात ती सुप्त असते तर कुणाची उघड होते. ही कला उघड होण्यासाठी एक वेळ यावी लागते. त्यामुळे स्वत:ला व्यक्त करण्याची जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल त्यावेळेला ही संधी कधीही सोडू नका Don’t miss the opportunity to express yourself , असा संदेश अभिनेते दिलीप प्रभावळकर Actor Dilip Prabhavalkar यांनी बाल मेळाव्यात बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिला.

साहित्य संमेलनातील बाल मेळाव्याचे प्रभावळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी बालकांशी संवाद साधताना त्यानी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

मला बालपणी शास्त्रज्ञ व्हावे असे वाटत होते. मात्र पुढे नाटक वाढले आणि या छंदाचे रुपांतर व्यवसायात झाले. त्यामुळे काय व्हायचे ते करू शकलो नाही. संधी हळूहळू मिळत गेल्याने मी आपली भूमिका बदलली, असे त्यांनी स्पष्ट केले. आवडत्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले भुमिकेवर प्रेम असल्याशिवाय भुमिका करता येऊ शकत नाही. चिमणराव ही दुरदर्शनवरील पहिली मालिका अमराठी लोकही पहात होते. यातील भुमिकेमुळे मी घराघरात पोहोचलो.

त्याचबरोबर लगे रहो मुन्नाभाई यातील गांधीजींची तसेच चौकट राजा मधील ऐनवेळी माझ्याकडे आलेली भुमिका मी निभावून नेली. हसवा फसवी मधील केलेल्या सहा भुमिकांपैकी शेवटची कृष्णराव हेडंमकर याची भुमिका आवडते असेही त्यांनी सांगितले.

अवघड भूमिकांबद्दल विचारले असता प्रभावळकर म्हणाले हसवा फसवी या नाटकातील 6 भुमिका अवघड होत्या. इतर भूमिकांमध्ये मला हवे तसे काम करायला मिळायचे. आबा टिपरे, तात्या विंचू सारखी भूमिका अवघड नव्हती. परंतु चरित्र भूमिका करताना लगे रहो मुन्ना भाई मधील महात्मा गांधी यांची भूमिका गांधीजी राष्ट्रपिता असल्याने साकारण्याची मोठी जबाबदारी होती असे प्रभावळकर यांनी सांगितले.

बोक्या सारखे साहित्य लिहिण्यासाठी काय करावे याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, साहित्याची संगत व पुस्तकाची साथ कधीच सोडू नका. चांगले साहित्य तुम्हाला नक्कीच लिहिण्यासाठी प्रेरणा देइल. आज तुम्हाला अनेक साधने उपलब्ध आहेत.ऑडिओ पुस्तके, मोबाईल अशी साधने आहेत. फक्त मोठ्यांचे मार्गदर्शन घेऊन कुठली पुस्तके वाचायची याची निवड करा असेही त्यांनी शेवटी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या