Saturday, July 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आतापर्यंत इतक्या लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस

जिल्ह्यात आतापर्यंत इतक्या लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस

जळगाव – jalgaon

कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व (Primary Health Center) प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही (Private hospital) खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

तर 1 मे ते 11 मेपर्यंत जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 21 जूनपासून जिल्ह्यातील 18 वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 938 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 916 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 938 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 916 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 5 लाख 86 हजार 210 तर ग्रामीण भागातील 6 लाख 26 हजार 644 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय झालेले लसीकरण

जळगाव-305148, भुसावळ-154978, अमळनेर-75401, चोपडा-77138, पाचोरा-64253, भडगाव-40198, धरणगाव-39869, यावल-67960, एरंडोल-35814, जामनेर-76621, रावेर-82325, पारोळा-40626, चाळीसगाव-93781, मुक्ताईनगर-36777, बोदवड-21965 याप्रमाणे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या