Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअंगावर काटा आणणारा अपघात! दुधाच्या टँकरला बसची भीषण धडक, १८ जणांचा मृत्यू

अंगावर काटा आणणारा अपघात! दुधाच्या टँकरला बसची भीषण धडक, १८ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh
उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला.बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या एका डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात बस आणि कंटेनरचाही अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. उत्तरप्रदेशातील बेहता मुजावर परिसरात हा भीषण अपघात झाला.

- Advertisement -

उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात घडला. लखनौ-आग्रा महामार्गावर बेहता मुजावर परिसरात असलेल्या उभ्या दुधाच्या कंटेनरला डबलडेकर बसने जोरदार धडक दिली. ही बस बिहारवरून दिल्लीला निघाली होती. तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकरला धडकली.त्यामुळे बस उलटली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नावमधील अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तात्काळ बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर योग्य ते उपचार करा असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बसमधील बहुतांश प्रवासी कामगार होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. २० जणांपेक्षा जास्त गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होत बचाव कार्याला सुरवात केली. मृत आणि जखमींना जवळच्या बांगरमौ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीसांकडून हा अपघात कसा झाला याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या