Friday, April 3, 2026
HomeनगरAhilyanagar : नगरच्या 1 लाख 26 हजार दुबार मतदारांची होणार पडताळणी

Ahilyanagar : नगरच्या 1 लाख 26 हजार दुबार मतदारांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने पाठवला जिल्हा निवडणूक विभागाला मतदारयादी पडताळणी कार्यक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर दुबार मतदारांवरून देशभरात गदारोळ उडाला आहे. यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दुबार नावे शोधून वगळण्याची मागणी केली होती. यावर भारत निवडणूक आयोगाने मतदारयादी पडताळणीचा कार्यक्रम सुरू केला असून, नगर जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 715 दुबार मतदार आढळून आले आहेत. दुबार आढळून आलेल्या या नावांची पडताळणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दुबार नावे, चुकीचे फोटो वगळण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेला कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीत एकापेक्षा अधिक वेळेस एकाच मतदाराचा फोटो, नाव असल्यास अशा मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे. बीएलओमार्फत या मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. यानंतर संबंधित मतदाराला कोणत्या यादीत नाव कायम ठेवायचे आहे, याबाबतचे शपथपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर मतदारांच्या इच्छेनुसार दुबार नाव, फोटो वगळले जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत, तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील मतदार यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातले 1 लाख 17 हजार 77 मतदार दुबार नावे आढळून आली आहेत.

संबंधित जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना अहिल्यानगर जिल्हा निवडणूक शाखेकडून दुबार मतदारांची यादी पाठवण्यात येणार आहे. या मतदारांची पडताळणी केल्यानंतर एकाच मतदार यादीत नाव राहणार आहे. शिवाय एकाच मतदारसंघातील यादी भागात दुबार नावे, फोटो असलेले 9 हजार 638 मतदार जिल्ह्यात आढळले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यातील 1 लाख 17 हजार 77 मतदार व जिल्ह्यातील 9 हजार 638 असे 1 लाख 26 हजार 715 मतदारांच्या नावांची पडताळणी करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...