जळगाव jalgaon । प्रतिनिधी
शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या माहेर असलेल्या विवाहितांचा पैशांची मागणी, चारित्र्यावर संशय Doubt over character या कारणावरुन छळ करुन संसार मोडल्याच्या Sansāra mōḍalyācyā घटना शुक्रवारी समोर आले आहे.
तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यामंडळीविरोधात गुन्हा दाखल झाले आहे. एका घटनेत तर लग्नानंतर चक्क महिनाभरात तरुणीचा संसार मोडला आहे.
माहेरुन पाच लाख आणावेत म्हणून छळ
शहरातील पिंप्राळा येथील मयुर कॉलनी येथील माहेर असलेल्या सेविया नितेश साळवे वय 27 या विवाहिेतेचा माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन शारिरीक व मानसिक छळ करणार्या पतीसह पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहानंतर पती निलेशसह सासरच्यांनी सेविया हिस माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन शिवीगाळ तसेच धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ केला.
वेळावेळी याच कारणावरुन होत असलेल्या छळाला कंटाळून सेविया ह्या माहेरी मयुरी कॉलनी येथे आल्या. महिला दक्षता समिती तक्रारीनंतरही समझोता न झाल्याने सेविया साळवे यांनी 13 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास छळाबाबत पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन सेविया हिचे पती नितेश साळवे, सुरेश जोसेफ साळवे, मेरी सुरेश साळवे, फिलीप सुरेश साळवे, भरत सुरेश साळवे सर्व रा. गोदावरी कॉलनी सटाणा रोड, मनमाड नाशिक या पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहेत.आवडत नाही म्हणत महिनाभरात संसार मोडला
लग्नानंतर अवघ्या महिनाभरात तु आवडत नाही, तुम्ही आम्हाला चालत नाही, असे मोबाईलवर मेसेज पाठवून जळगाव शहरातील रायसोनी नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी नागपूरातील पतीसह सासरच्या 4 जणांविरोधात शुक्रवार, 13 ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुवर्णा सचिन निंबुळकर वय 29 असे तक्रारदार विवाहितेचे नाव असून तिच्या तक्रारीवरुन पती सचिन लक्ष्मण निंबुळकर, लक्ष्मण कोठीराम निंबुळकर, शारदा लक्ष्मण निंबुळकर, रितेश निंबुळकर, सर्व रा. महाजनवाडी, वानाडोंगरी, ता हिंगणा जि.नागपूर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहेत.