Saturday, October 24, 2026
Homeक्राईमSuicide News : हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची रेल्वेसमोर आत्महत्या

Suicide News : हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची रेल्वेसमोर आत्महत्या

सोन्याचे दागिने घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा पतीकडून तगादा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सोन्याचे दागिने घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून विवाहितेचा पतीकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून विवाहितेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना निंबळक (ता. अहिल्यानगर) येथे घडली. निर्मला अविनाश शिंदे (रा. निंबळक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, मयत निर्मला यांचे वडील सुरेश बंडू भोसले (वय 66, रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून पती अविनाश बबन शिंदे (रा. निंबळक) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भोसले यांची मुलगी निर्मला हिचे सन 2004 मध्ये निंबळक येथील अविनाश शिंदे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर ती निंबळक येथेच राहत होती. अविनाश याची सुपा येथे कंपनी होती. मात्र, कंपनी आर्थिक अडचणीत आल्यानंतर सन 2020 पासून निर्मलाकडे माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावला जात होता.

तसेच सोन्याचे दागिने घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून तिच्याशी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निर्मलाच्या कुटुंबीयांनी अविनाश याला अनेकदा समजावून सांगितले. आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असून मोलमजुरी करून संसार चालवित असल्याचे सांगत मुलीला चांगले नांदविण्याची विनंती केली होती. नातेवाईकांच्या बैठका घेऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास भोसले हे घरी असताना शेजारील महिलेने फोन करून निर्मलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर ते निंबळक येथे पोहोचले असता रेल्वे पटरीजवळ गर्दी जमलेली दिसली. चौकशी केल्यानंतर मुलगी निर्मलाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना समजले.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...