Friday, May 24, 2024
Homeनगरहुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या

हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या कारणासाठी निपाणी जळगाव येथे विवाहितेचा छळ केला जात होता. सासरच्या लोकांकडून होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने बुधवारी (दि.19) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत मयत विवाहितेची आई गंगुबाई शंकर चेमटे यांनी सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेमटे यांची मुलगी अवंतिका हिचे लग्न दोन महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथील विशाल सतीश चौधरी यांच्याशी झाले होते. चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी अवंतिकाचा छळ केला जात होता. याबाबत मुलीने आई-वडिलांना सांगितले होते. वेळोवेळी होणार्‍या छळाला कंटाळून बुधवारी (दि.19) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलीची आई गंगुबाई चेमटे यांच्या फिर्यादीवरून नवरा विशाल सतीश चौधर, सासरा सतीश रघुनाथ चौधर, सासु संगीता सतीश चौधर, भाया अक्षय सतीश चौधर, जाऊ स्वरा अक्षय चौधर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या