सावदा Savada ( प्रतिनिधी )
सावदा पोलिसांनी (police) दोन चोरट्यांना (thieves) अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या (Stolen) तब्बल 12 मोटारसायकली (Motorcycles) जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सावदा पो. ठा. गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?political big news # यामुळेच घोळ झाला : मुलगा मंत्री अन् स्वतःमुख्यमंत्री!
प्रतिदिनी वेगवेगळ्या भागात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना पो. अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सावदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि जालिंदर पळे ,पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह पोहेकॉ उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, पोना मोहसीन खान पठाण, यशवंत टहाकळे, विनोद तडवी, पोकॉ मनोज तडवी, चालक पोकॉ नामदेव कापडे यांनी नाकाबंद केली.
या नाकाबंदीच्या कारवाईत जावेद मुबारक तडवी रा. पातोंडा ता.जि. बुरहानपूर हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी मोटारसायकल अडवून त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी केली असता सोबत असलेली दुचाकी ही सावदा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याती असल्याचे निष्पन्न झाले.
पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्दबनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्याला दिड लाखांचा गंडा
संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली. त्याचप्रमाणे त्याने त्याचा साथीदार मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल याच्या साथीने सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता. जामनेर, लालबाग ता.जि. बुरहानपुर, गणपतीनाका बुरहानपुर मध्यप्रदेश येथुन देखील मोटार सायकलींची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल असे नाव सांगितले. पोलीसांनी दोघांना अटक केली.
दोघांकडून आत्तापर्यंत १२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे करीत आहे.
नवनवीन गोष्टी विकसित होण्यासाठी वाचन वाढवा- डॉ.मधुलिका सोनवणे