Thursday, May 22, 2025
Homeनगरघरकामगारानेच टाकला डॉ. वैद्य यांच्या घरी दरोडा

घरकामगारानेच टाकला डॉ. वैद्य यांच्या घरी दरोडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

अहमदनगर शहरातील डॉ. अरुण वैद्य यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालणारे दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. 1 लाख 70 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्यांचे दागिने व रोख असा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये डॉ. वैद्य यांच्या घरी काम करणारानेच साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे.

आकाशसिंग रघुविरसिंग जुन्नी ( 19, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) व सागरसिंग बलविरसिंग जुन्नी (वय 23, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 15 फेबु्रवारीला डॉ. वैद्य यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा 25 ते 30 वयोगटातील अनोळखी 6-7 व्यक्तींनी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला होता. त्यांची पत्नी यांना कटावणी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देऊन 28 तोळे वजनाचे सोने व हिर्‍यांचे दागिने तसेच 10 लाख रुपये रोख असा 21 लाख 20 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरिक्षक कटके यांना माहिती मिळाली, डॉ. वैद्य यांच्या घरी मागील 3-4 वर्षापासून कामास असलेला आकाशसिंग जुन्नी याने त्याच्या साथीदारासह गुन्हा केला असून तो माळीवाडा वेस येथून पळून जाण्याच्या तयारीत आहे. पथक तातडीने सदर ठिकाणी गेले असता, तेथे असलेल्या दोघांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना एकजण गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला.

तर आकाशसिंग जुन्नी या पोलीसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. डॉ. वैद्य यांनी त्यांच्या घरातील सामान 5ते 6 लोकांना सोबत घेऊन त्याने करून दिले होते. त्यावेळी डॉक्टरांच्या पत्नी यांना घरातील सोन्यांचे व हिर्‍याचे दागिने तसेच रोख रक्कम सुटकेसमध्ये भरताना पाहिले होते. याबाबत आकाशसिंग व सागरसिंग यांनी त्यांच्या नात्यातील करणसिंग टाक (रा. आष्टी, जि. बीड) यास माहिती दिली. त्यावरून करणसिंग याने त्याच्या 5-6 साथीदारांना व सागरसिंग यांना सोबत घेऊन डॉक्टरांच्या घरी दरोडा टाकल्याची हकिगत सांगितली. चोरी केलेले सोने व हिर्‍याचे दागिने, रोख रकमेबाबत विचारपूस केली असता, त्याने सागरसिंग याच्याकडे गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम असल्याची माहिती दिली.

दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागरसिंग जुन्नी हा नगर येथे लग्न समारंभाकरीता आला असून काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने कटके यांनी पोलीस पथकास कारवाईची सूचना केली. पथकाने वेशांतर करुन काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे जाऊन झाडाखाली बसलेल्या सागरसिंग बलविरसिंग जुन्नी यास ताब्यता घेतले. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक दिनकर मुंढे, सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, मनोज गोसावी, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, सागर ससाणे, मयूर गायकवाड, रोहीत येमुल, विजय धनेधर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘एफडीए’तील दोघांची चौकशी; सुपारीकांडाचा सखोल तपास, साखळी उघड...

0
नाशिक |प्रतिनिधी | Nashik अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी दोन ट्रकचालकांकडील रोकड, मोबाइल, वाहनांची कागदपत्रे व चाव्या हिसकावून नेल्याची घटना...