दोंडाईचा । Dondaicha
येथील प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांच्या पत्नी, मंदाकिनी टोणगावकर स्कुलच्या संचालिका, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा, रोटरी क्लबच्या संस्थापक सदस्या डॉ. आशाताई टोणगावकर (Dr. Ashatai Tongaonkar) (वय 80) यांचे दि. 2 नोव्हेंबर रोजी निधन झाले.
डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना डॉ. टोणगावकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली.
डॉ. आशाताई टोणगावकर (Dr. Ashatai Tongaonkar) यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होती. त्या शहराच्या विविध सामाजिक आर्थिक व सेवाभावी संस्थाच्या पदाधिकारी होत्या.
दोंडाईचासह परिसरातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. राजेश टोणगावकर, डॉ. ज्योत्स्ना टोणगावकर यांच्यासह परिवाराचे सांत्वन केले.