नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे शनिवारी नवनियुक्त आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे स्वीकारली. यावेळी त्यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी महापालिकेतील खाते प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त श्रीकांत पवार, उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, प्रशांत पाटील, शहर अभियंता नितीन वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्यलेखापरीक्षक उत्तमराव कावडे, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.कल्पना कुटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,आयुक्तांचे स्वीयसचिव दिलीप काठे, संगीता पवार, चंद्रकांत सोनार, वाल्मिक ठाकरे आदी उपस्थित होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि विकासाच्या दृष्टीने प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे. शहरासाठी आवश्यक असणार्या मूलभूत गरजा पुरविण्याच्या कर्तव्याला प्राधान्य दिले जाईल. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने स्रोत निर्माण करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगितले. प्रशासकीय नियमानुसार कामकाज केले जाणार असल्याचे सांगितले.