Wednesday, April 2, 2025
Homeनाशिकसिन्नरमध्ये डॉ. चौधरींचे भाषण बंद पाडले

सिन्नरमध्ये डॉ. चौधरींचे भाषण बंद पाडले

सिन्नर । प्रतिनिधी sinnar

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विश्वंभर चौधरी यांचा सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेतील निर्भय बनो विषयावरील व्याख्यानात काही गटांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्यांचे भाषण बंद पाडले.

- Advertisement -

भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी डॉ.चौधरी यांच्यासमोरील माईक हिसकावून घेतला तर माजी शहराध्यक्ष सुनिल तथा बाळासाहेब हांडे यांनी डॉ. चौधरी यांच्या हातातील व्याख्यानाचे मुद्दे असलेले कागद फाडून टाकले. जय श्रीरामसह विविध घोषणा देत श्रोत्यांनाही सभागृहाबाहेर पडण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले.

व्याख्यानमालेतील चौथे पुष्प डॉ. चौधरी यांनी गुंफण्यास सुरुवात केली. त्यांनी भाषणात महात्मा गांधी, बॅ. जिना, गोडसे, भारत पाकिस्तान फाळणी, पाकिस्तानला 55 कोटी, या मुद्यांवर बोलण्यास सुरूवात केली होती. तसेच आताही देशभर विचार, अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर बंदी, माध्यमांचे बदलेले स्वरूप यावर भाष्य करताना सभागृहात बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी व्यासपिठाकडे धाव घेतली. जयंत आव्हाड यांनी चौधरी यांचा माईक हिसकावून घेतला. बाळासाहेब हांडे यांनी कागदपत्रे हिसकावून फाडली. समाधान गायकवाड हे तावा-तावाने ओरडत कार्यंकर्त्यांना भडकावण्याचे काम करत होते. व्यासपिठाजवळ गोंधळ घालत या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामसह विविध घोषणा देण्यास सुरुवात केली व भाषण बंद करण्याची मागणी केली. हे कार्यकर्ते आर.एस.एस., बजरंगदल, भाजपचे असल्याचे बोलले जात होते.

काही उत्साही कार्यकर्ते थेट चौधरी यांच्या अंगावर धाऊन गेले. मात्र, दत्ता वायचळे, अ‍ॅड. विलास पगार, हरीभाऊ तांबे, अ‍ॅड. अण्णासाहेब सोनवणे, दत्ता गोळेसर, डॉ. श्यामसुंदर झळके, सागर गुजर, जितेंद्र जगताप, नामदेव कोतवाल यांच्यासह अनेक रसिक व वाचनालयाच्या संचालकांनी त्यांना रोखले. माझ्या व्याख्यानाने तुमच्या गावातील वातावरण दूषित होणार असेल तर मी व्याख्यान थांबवतो, असे म्हणत चौधरी यांनी भाषण थांबवले. तरी हे कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते. तुम्हाला त्यांचे विचार पटत नसतील तर तुम्ही निघून जा. आम्हाला ऐकू द्या, अशी मागणी काही रसिकांनी केली. मात्र, चौधरी सभागृहाबाहेर जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ सुुरुच ठेवला.

त्यानंतर पोलिसांनी सभागृहात येवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचे ते ऐकत नव्हते. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, विलास पाटील, नरेंद्र वैद्य यांनी त्या कार्यकर्त्यांची समजूत घालत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांच्या संरक्षणात चौधरी यांना सभागृहातून बाहेर नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी मराठा सेवा संघ, राष्ट्र सेवा दल, सिटू, महामित्र परिवार, अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. डॉ. चौधरी यांना थोडे अस्वस्थ वाटू लागल्यानंतर डॉ. सागर सदगिर व डॉ. जी. एल. पवार त्यांची तपासणी केली. त्यानंतर ते कारने पुण्याकडे रवाना झाले.

हुकूमशाही आहे का?

डॉ. चौधरी सत्य तीच परिस्थिती मांडत होते. त्यांच्यावर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांचे विचार पटत नसतील तर ऐकू नका. मात्र, त्यांना बोलूच द्यायचे नाही ही गुंडगिरी झाली. देशात हुकूमशाही आली आहे का? असे प्रकार यापुढे वाचनालयात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या गुंडगिरीचा आम्ही निषेध करतो.

– कृष्णाजी भगत, अध्यक्ष, सिन्नर सार्वजनिक वाचनालय

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Bill : ‘वक्फ’ आज लोकसभेत; विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपचा ‘बिग...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वक्फ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाईल. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब...