Friday, May 31, 2024
Homeनाशिकजि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.गुंडे

जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.गुंडे

नाशिक | Nashik
जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (Additional CEO) सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP CEO) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए. टी. गुंडे यांची बदली झाली आहे.

जि.प. जलजीवन मिशनचे संचालक ईशाधीन शेळकंदे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी बदली झाली आहे. शेळकंदे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची बदली झाली आहे.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाचे (Rural Development Department) राज्यातील उपमुख्यकार्यकारी अधिकारी संवर्गातील ९ अधिकायांच्या बदल्याचे आदेश निघाले आहेत. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांची पदोन्नती (Promotion) झाल्यानंतर रिक्तपदी असलेल्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांची बदली झाली आहे. डॉ. गुंडे यांनी नाशिक येथे जलस्वराज्य प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलेले आहे.

जलजीवन मिशन विभागाचे (पूर्वीचे नाव पाणी स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी) संचालक शेळकंदे यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी (ग्राम पंचायत)अधिकारी पदी झाली आहे.

साडेतीन वर्षापूर्वी त्यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेत झाली होती. त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्हयाला स्वच्छतेचा केंद्रीयस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय नाशिक जिल्हा शौचालयमुक्त ही त्यांच्या कार्यकाळात झाला.त्याबद्दलचा राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. शेळकंदे यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या