Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रMangala Narlikar : ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

Mangala Narlikar : ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

मुंबई | Mumbai

भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर (Mangala Narlikar)यांचे निधन झाले आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. पाठीमागील प्रदीर्घ काळापासून त्या कर्करोगाच्या दुर्धर अजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मधल्या काळात त्यांनी आपल्या असाध्य आजारावर वैद्यकीय उपचारांनी मातही केली होती. मात्र, अखेर त्यांना मृत्यूने गाठलं. सकाळी ५.३० च्यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने एक मराठी गणितज्ज्ञ हरपला आहेच. परंतू, त्यासोबतच एक लेखिका (Mangala Narlikar Books) शिक्षिका, विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि संशोधकही आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. त्यांनी विद्यापीठातून पहिल्या येण्याचा बहुमान मिळवला. १९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात सहायक संशोधक व त्या नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. तर १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात देखील गणिताचे अध्यापन केले.

१९६५ मध्ये मंगला राजवाडे यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. डॉ. मंगला त्यांनी प्रगत गणितावर काम असून लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्या निपुण होत्या. डॉ. मंगला यांनी इंग्रजी व मराठी भाषेत विविध विषयांवर पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे आदी पुस्तके गाजली आहेत. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू, तर बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या