Friday, December 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल जाहीर; दोघांना जन्मठेप तर तिघांची सुटका

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल जाहीर; दोघांना जन्मठेप तर तिघांची सुटका

मुंबई | Mumbai
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून त्याचा निकाल समोर आला आहे. पुणे सीबीआय विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. तर, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले. सीबीआय कोर्टाने डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पु्नाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली. तब्बल ११ वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे.

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. पुनाळेकर आणि भावे विरोधात आरोप सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने निकाल वाचनात म्हटले. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, डॉ. वीरेंद्र तावडे याच्यावर कटकारस्थानाचा आरोप करण्यात आला होता. तर अॅड. संजीव पुनाळेकर याने शस्त्र नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

- Advertisement -

या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालय म्हणाले, कोणाचाही खून होणे ही दुर्देवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

दाभोलकरांची हत्या कशी झाली होती
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावर सकाळी सव्वा सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता. या खुनाचा खटला ८ वर्षानंतर सुरु होऊन गेल्या अडीच वर्षापासून हा खटला सुरु होता.

१५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या