Friday, May 16, 2025
HomeनगरAhilyanagar : योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना..; काय म्हणाल्या डॉ. नीलम गोर्‍हे

Ahilyanagar : योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना..; काय म्हणाल्या डॉ. नीलम गोर्‍हे

महायुतीबाबत फडणवीस, शिंदे, पवार निर्णय घेतील

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून दीड हजार रुपये महिना सुरू असून वाढीव मदतीसाठी महिलांनी कोठे मोर्चे काढलेले दिसत नाहीत. सध्या सरकारसमोर अवकाळी पावसासह अन्य प्रश्न असून ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपयांप्रमाणे मदत करणार आहे. यामुळे या विषयात कोणीही दिशाभूल करू नये. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार एकत्र निर्णय घेतील, ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी महायुती म्हणून तर उर्वरित ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवल्या जातील, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिली.

गुरुवारी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधतांना उपसभापती डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीसह विविध घटकांमुळे महायुतीला प्रचंड यश मिळाले. यात राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचा सहभाग महत्त्वाचा असून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणे शक्य आहे, त्या ठिकाणी एकत्र निवडणुका लढण्यात येतील. ज्या ठिकाणी शक्य होणार नाही, त्या ठिकाणच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील.

नगर महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत नगर जिल्हा परिषद निवडणुकीतही शिंदे गट चांगले यश मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरसह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसत असून या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी निधीची मागणी ही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऊसतोड व घरकामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करून मोहिमस्तरावर नोंदणी करण्यात यावी, असे निर्देश डॉ. गोर्‍हे यांनी प्रशासनाला दिले.

तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले आदी उपस्थित होते.

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शैक्षणिक सुविधा, सामाजिक सुरक्षा योजना इत्यादींचा लाभ मिळावा, यासाठी नोंदणी शीघ्रगतीने पूर्ण करण्यात यावी. कामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. कामगारांचा आरोग्य विमा व अपघात संरक्षण विमा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. यासाठी प्रस्ताव तयार करून तो सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर निधीतून 3 टक्के निधी महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव असतो. या निधीचा उपयोग महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनांसाठी करावा. पीडित महिलांना ङ्गमनोधैर्यफ योजनेतून मदत केली जाते. परंतु अत्याचार घडल्यास तातडीची मदत या निधीतून करण्यात यावी.

बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास गंभीरपणे व संवेदनशीलतेने व्हावा, यासाठी जिल्ह्यात बालस्नेही पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी बालस्नेही पोलीस ठाण्यांच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. जिल्ह्यातील भरोसा सेलचे सक्षमीकरण करावे. ज्या ठिकाणी भरोसा सेल उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ऑनलाईन भरोसा सेल तातडीने कार्यान्वित करावेत. भरोसा सेलमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातून सेवा देता यावी, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. गृहभेटीद्वारे पीडित महिलांचे समुपदेशन करण्यात यावे.

अँटी रॅगिंग सेलविषयीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांशी बैठक घेऊन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. अंमली पदार्थविरोधी जागृती कार्यक्रमही राबवावा. सखी सावित्री समितीसाठी एक निश्चित कार्यपद्धती आखावी. याचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनाही होईल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने ङ्गसमाधान शिबिरांचेफ आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात अनेक धार्मिक व इतर पर्यटनस्थळे असून, त्या ठिकाणी सातत्याने पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या समस्या नोंदविण्यासाठी मदत सेवा केंद्र सुरू करण्यात यावे. यासाठी स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करावी. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणार्‍या लोकशाही दिनामध्ये महिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवून तक्रारींचे निवारण करण्यात यावे. वीज पडून होणार्‍या मनुष्य व वित्त हानीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात वीज अपघात प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Newasa : जिल्हा बँकेची शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्जवसुलीच्या हालचाली

0
पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav नेवासा तालुक्यात सहकारी सोसाट्याच्या अंतर्गत जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. पण त्यात सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात येईल,...