Saturday, May 4, 2024
Homeनाशिकबिटकोतील डॉ. पंकज वसावेंचे करोनामुळे निधन

बिटकोतील डॉ. पंकज वसावेंचे करोनामुळे निधन

नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)

महापालिकेच्या नाशिकरोड येथील जुने बिटको रुग्णालयातील समर्पित सेवा देणारे डॉ. पंकज रामसिंग वसावे (45) यांचे आज येथे करोनामुळे निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या पश्चात आई-वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. डॉ. पंकज वसावेंचे निधन झाल्याचे समजताच बिटकोतील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले.

नवीन बिटको करोना रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरु होते. सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सहकारी डॉक्टर, नर्स त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. त्यांनाही अखेर नियतीपुढे हार मानावी लागली.

डॉ. पंकज वसावे हे जुने बिटको रुग्णालयात दोन वर्षांपासून मानधना तत्वावर सेवा देत होते. गेले सहा महिने त्यांना व त्यांच्या सहका-यांना वेतन मिळालेले नव्हते. याबाबत नगरसेवक जगदीश पवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्रही दिले होते.

गेल्या लॉकडाउनमध्ये वसावे यांची नियुक्ती बिटको करोना रुग्णालयात झाली होती. तेथे त्यांनी सात-आठ महिने सेवा देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. नंतर ते पुन्हा जुन्या बिटकोत रूजू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता.

वसावे यांच्यावर नवीन बिटकोत उपचार सुरु होते. ते व्हेन्टिलेटरवर होते. दुर्देवाची बाब म्हणजे वडिल आणि एका बहिणीलाही करोना झालेले असून त्यांच्यावर बिटकोमध्ये तर दुस-या बहिणीवर संदर्भ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या