मुंबई | Mumbai
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे (Sant Gadgebaba Amravati University) कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे, दि. २८ जानेवारीपासून हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी या विद्यापीठाचा (Universities) कारभार चालविण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे…
- Advertisement -
राज्यपाल (Governor) तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एका आदेशान्वये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सोपविला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रमोद येवले यांना सांभाळावा लागणार आहे. यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.