Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकडॉ.प्रवीण गेडाम यांनी विभागीय महसूल आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

डॉ.प्रवीण गेडाम यांनी विभागीय महसूल आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी कृषी विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच राधाकृष्ण गमे यांनी डॉक्टर गेडाम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांनी काही उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

- Advertisement -

राधाकृष्ण गमे यांनी आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली होती त्याचप्रमाणे प्रशासनाला शिस्त लावली होती गमे आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य निरोप देण्यात आला महसूल आयुक्त कार्यालयात उत्कृष्ट अशी सजावट करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे फलक लावण्यात आले होते. नवनिर्वाचित महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे कृषी विभागाचे आयुक्त असून त्यांची अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी आज दुपारी याबाबत आदेश काढले व पदभार स्वीकारण्यास सांगितले डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून सुद्धा यापूर्वी काम केले आहे

एक कर्तव्यदक्ष व कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे डॉक्टर गेडाम हे आयुक्तअसताना त्यांच्या कारकीर्दीत सिंहस्थ झाला होता त्या काळात त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा आगामी होणाऱ्या सिंहस्थ काळात त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला फायदा होणार आहे त्याचप्रमाणे जळगाव येथे गाजलेल्या घरकुल घोटाळा सुद्धा त्यांनी उघडकीस आणला होता यामध्ये जळगावचे माजी आमदार व माजी मंत्री सुरेश दादा जैन यांना शिक्षा होऊन कारावास झाला होता त्यामुळे डॉक्टर प्रवीण गेडाम हे राज्यभर चर्चेत होते आता नव्याने त्यांना महसूल आयुक्त पदाची जबाबदारी मिळाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या