Thursday, January 8, 2026
Homeजळगावडॉ.शिंदे विजयी होतील अन् महाविकास आघाडीचे सरकार येणार-प्रा.सुभाष पाटील

डॉ.शिंदे विजयी होतील अन् महाविकास आघाडीचे सरकार येणार-प्रा.सुभाष पाटील

अमळनेर । प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षात आजी-माजी आमदारांनी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, मात्र यंदा बळीराजा त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देणार असल्याचा विश्वास प्रा.सुभाष पाटील (जीभाऊ) यांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार असून नियमित शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन सुट देणार आहे.

- Advertisement -

तसेच शेतकर्‍यांना हमीभाव मिळवून देऊन पीकविम्यातील जाचक अटी काढून सुलभ योजना तयार करणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला शेतकर्‍यांसह जनतेचा मोठा प्रतिसाद राज्यभरातून लाभत आहे. तालुक्यात गेल्या दहा वर्षात अस्मानी सुलतानी संकटांनी थैमान घातले. माजी आमदार शिरीष चौधरी हे पाच वर्ष बेपत्ता होते, आणि मंत्री महोदय यांनी जाणून बुजून शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. शेतकर्‍यांवर ‘आपत्ती’आलेली असताना त्यांना मदत न करणार्‍या आजी माजींचे पुनर्वसन आता शेतकरी राजा करणार असल्याचे प्रा. सुभाष जिभाऊ यांनी सांगत डॉ.अनिल शिंदे भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचे सांगितले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....