Saturday, May 18, 2024
HomeधुळेDhule Loksabha 2024 : डॉ. सुभाष भामरेंपेक्षा डॉ. बच्छाव अधिक श्रीमंत

Dhule Loksabha 2024 : डॉ. सुभाष भामरेंपेक्षा डॉ. बच्छाव अधिक श्रीमंत

दोघांची संपत्ती नेमकी किती?

नाशिक | Nashik

धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी (Candidates) उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणात त्यांच्या संपत्तीची एकूण आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr.Subhash Bhamare) यांच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr.Shobha Bachhav) श्रीमंत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे ७ कोटी ४३ लाख ७१ हजारांची स्थावर मालमत्ता आहे, तर डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे १४ कोटी ३२ लाख १० हजार ७९३ रुपयांची स्थावर मालमत्ता (Property) असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेस (Congress) उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे ७ लाख ३२ हजार ७४० रुपये तर त्यांच्या पतीकडे ११ लाख २८ हजार ३२० रुपये रोख आहेत. डॉ. बच्छाव यांच्याकडे १ कोटी १९ लाख २ हजार ८८४ रुपयांची तर त्यांच्या पतीकडे २ कोटी ७७ लाख ३६ हजार २७२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांनी गौरव बच्छाव यांच्या प्रतिष्ठानात ५ लाखांची तर संगीता भालेराव यांच्या प्रतिष्ठानात १० लाख ५ हजारांची गुंतवणूक केली आहे.

तसेच विविध बँकांमध्ये (Bank) त्यांच्या मुदती ठेवी आणि बचत आहे. याशिवाय डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे २६ लाख ९१ हजार ६३८ रुपये किमतीची कार आहे. तसेच डॉ. बच्छाव यांच्याकडे ३५० ग्रॅम सोने असून, त्याची किंमत २१ लाख रुपये आहे. तर त्यांच्या पतीकडे ९ लाखांचे १५० ग्रॅम सोने आहे. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे पिंपळगाव वखार, मखमलाबाद येथे शेतजमीन आणि नाशिक येथे भूखंड आहे. शिवाय मुंबईतील अंधेरी भागातील लोखंडवाला परिसरात सदनिका आहे. डॉ. बच्छाव यांच्याकडे एकूण १४ कोटी ३२ लाख १० हजार ७९३ रुपयांची तर त्यांच्या पतीकडे १२ कोटी ३८ लाख ५७ हजार १०९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

तर डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे ६ लाख ८४ हजार तर त्यांच्या पत्नीकडे ८ लाख रुपयांची रोख रक्कम आहे. डॉ. भामरे यांच्याकडे २ कोटी ८४ लाख ५२ हजार ९६९ रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे ३ कोटी ७७ लाख २१ हजार ५७९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात विविध बँकेतील मुदत ठेवी, शेअर्सचा समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्यावर कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज नाही. तसेच वरळी येथे त्यांच्या मालकीची सदनिका आहे. त्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील खेडे येथे १२ एकर तर न्याहळोद येथे १५ एकर जमीन आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे खेडे येथे १८ एकर जमीन आहे. डॉ. भामरे यांच्या पत्नीकडे ३६७.७७ ग्रॅम सोने आहे. त्याचे मूल्य २७ लाख २१ हजार ४९८ रुपये एवढे आहे. शिवाय २८ हजारांचा एक हिरा आहे. डॉ. भामरे यांची स्थावर मालमत्ता ७ कोटी ४३ लाख ७१ हजार रुपये किमतीची तर त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता ४ कोटी ७० लाख ४६ हजार रुपये किमतीची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या