Saturday, May 17, 2025
Homeक्रीडानाशिकचे भूमीपुत्र डॉ. सुभाष पवार बनले भारताचे एकमेव वयोवृद्ध 'अल्ट्रामॅन'

नाशिकचे भूमीपुत्र डॉ. सुभाष पवार बनले भारताचे एकमेव वयोवृद्ध ‘अल्ट्रामॅन’

नाशिक | Nashik

- Advertisement -

मेक्सिको (Mexico) देशातील कोझुमेल ह्या बेटावर नुकत्याच झालेल्या जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या, शारीरिक व मानसिक क्षमतेचा अंत पाहणाऱ्या ‘अल्ट्रामॅन’ (Ultraman) ह्या स्पर्धेत डॉ. सुभाष पवार (Dr. Subhash Pawar) ह्यांनी दि. 9 एप्रिल 2023 रोजी भाग घेवुन ती स्पर्धा यशस्वीरीत्या जिंकली.

त्यामुळे ते भारतातील एकमेव वयोवृद्ध ‘अल्ट्रामँन” बनले आहेत. ही स्पर्धा 3 दिवसांची असते. त्यात पहिल्या दिवशी 10 कि.मी. स्विमिंग व 145 कि.मी. सायकलिंग (cycling) असून त्यांनी 14.13 तासात हे अंतर पुर्ण केले.

दुसऱ्या दिवशी 280 कि. मी. सायकलिंग 13.13 तासात व तिसऱ्या दिवशी 85 कि. मी. रनिंग (running) 13.41 तासात पुर्ण करुन डॉ. सुभाष पवार यांनी ही एकूण स्पर्धा 41.09 तासात जिंकली.

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं…

जगातील विविध देशातील स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेच्या सुरवातीलाच स्विमिंग (Swimming) सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच समुद्रात वादळ सुरू झाले आणि ते वाढतच गेले. 6 ते 7 फुटाच्या लाटा तयार झाल्या. त्यामुळे सर्वच स्पर्धकांना स्विमिंग करतांना लाटांच्या व वाऱ्याच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आयोजकांनी स्विमिंग बंद न करता चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. सायकलिंग व रनिंगलाही प्रचंड उष्णता व 90% आद्रता ह्यामुळे स्पर्धकांची स्पर्धा पुर्ण करतांना चांगलीच दमछाक झाली, डॉ. पवार यांनीही हिम्मत न सोडता व होणाऱ्या त्रासाचा विचार न करता स्पर्धा पुर्ण केली. त्यामुळे वयाच्या 67 व्या वर्षी ‘अल्ट्रामँन” ही स्पर्धा पुर्ण करणारे एकमेव वयोवृद्ध भारतीय बनले आहेत.

डॉ. सुभाष पवार हे सातपूर येथील रोहित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असून ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यांतील जायखेडा येथील आहेत, त्यांनी बागलाण चे नाव जगात उंचावले आहे. पुढेही अशा अवघड स्पर्धांमधून वय व फिटनेस जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत भाग घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. नाशिकमधून आयर्नमॅन सारखेच अजून “ अल्ट्रामँन ” तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा असून त्यासाठी ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Agriculture News : यंदा खरिपाचे क्षेत्र वाढणार!

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार...