Sunday, October 4, 2026
HomeनगरAhilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू खराब...

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू खराब झाला

डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पण्णी || भाजपात गेल्यापासून डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झालाय..

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही सुजय यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्यं केलं.

- Advertisement -

मी मेंदूचा डॉक्टर आहे; परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला, अशी मिश्किल टिप्पणीही सुजय विखे पाटील यांनी केली. नगरमध्ये तब्बल 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. मात्र, नगर-मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याच सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला आहे, असे विखे यांनी म्हटलं आहे.
सुजय विखे यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा उपाय नाही.

रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन सुजय विखे पाटील यांनी केले. डोनाल्ड ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागते. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत, असा दावा त्यांनी केला. नगर-मनमाड महामार्गाच्या कामालाही या परिस्थितीचा फटका बसला असून, नगर-मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या विखे यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा रंगली आहे.

भाजपात गेल्यापासून डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झालाय..

मुंबई | Mumbai

ट्र्म्प यांच्या बद्द्लची टीका आणि मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू खराब झाला यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सांगितलं आहे की, आता काय ट्र्म्प येऊन रस्त्यांचं काम करणार आहेत का? फोडून फोडून खापर तुम्ही कोणावर फोडलं. कमीत कमी तुमच्या सरकारवर तरी फोडायचं होतं? असा सवाल केला.

तसं पाहिलंतर राजकारणात आले म्हणून त्यांचा मेंदू खराब झाला नाहीतर भाजपात आल्यापासून त्यांचा मेंदू खराब झाला आहे. भाजपा सोडा.. विरोधात या..एकत्रित मस्तपणे लोकांच्या हितासाठी काम करू. भाजपात काहींचा मेंदू खराब झाला आहे. त्यांचा मेंदू दुरूस्त करायचा असेलतर बरोबर काम करू.अजूनही वेळ गेली नाही असे सांगण्यासही पवार विसरले नाहीत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्रोपचारांचा बनाव रचून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्याविरुद्धच्या कायदेशीर...