Wednesday, February 4, 2026
Homeनगर35 वर्षे त्यांना दिली, 5 वर्षे माझ्या सारख्या युवकाला द्या - डॉ....

35 वर्षे त्यांना दिली, 5 वर्षे माझ्या सारख्या युवकाला द्या – डॉ. सुजय विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

जोर्वे गावाने आजपर्यंत केवळ विकासाच्या कामावर विखे परिवाराला साथ दिली. विकास काय असतो हे ना.विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे. आता तालुक्यातील अन्य गावांत युवकांच्या सहकार्याने विकासाचे परीवर्तन असेच घडवायचे आहे. तालुक्याने 35 वर्षे त्यांना दिली, पाच वर्षे माझ्या सारख्या युवकाला द्या, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पीठाच्या गिरणीचे वितरण डॉ.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गावात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गावातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

डॉ विखे पाटील म्हणाले, ना.विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहता यापुर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले? असा प्रश्न पडतो. शिर्डी विधानसभा मतदार संघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला. कोविड संकटात येथील लोकप्रतिनीधी कुठे होते? जेव्हा लोकांना औषधाची आणि रेमडिसिव्हरची गरज होती, तेव्हा फक्त विखे पाटील परीवार सर्वांच्या सोबत उभा राहिल्याचे सांगून जोर्वेत एक कोविड सेंटर टाकू शकले नाहीत. गावात पूर आला, तेव्हा सुध्दा गावाकडे पाठ फिरविणार्‍यांंना लोकांनी पुरते ओळखले आहे. जोर्वे गावात दशक्रीयाविधीचा घाट बांधला. शेजारील गावांना येथे दशक्रीयाविधी साठी यावे लागते. पण काळजी करू नका प्रत्येक गावात दशक्रीयाविधी घाट बांधून देण्यासाठी पुढाकार घेऊ. गेली अनेक वर्षे सर्व सतास्थान यांच्या कुटुंबांच्या ताब्यात आहेत. तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी अनेक वर्षे पाहायला मिळतात.

YouTube video player

राहाता तालुक्यात सर्व पदे सामान्य माणसाच्या ताब्यात आम्ही दिली. आमच्यावर दहशतीचा आरोप करता, येथील सामान्य माणसाच्या आदीवासींच्या जमिनी बळकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मग दहशत कोणाची? जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना उदरनिर्वाहाकरिता पीठाची गिरणी उपलब्ध करून देत आहोत. येणार्‍या काळात आणखीही साधन साहित्य देऊन महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. महायुती सरकारने अनेक योजना महिला, युवक, शेतकरी यांच्यासाठी सुरू केल्या. योजना युती सरकारच्या आहेत. पण फोटो लावून पत्रक वाटायचे काम विरोधी मंडळी करीत असल्याने महायुतीचे काम विरोधकांना सुध्दा मान्य आहे. पण युती सरकारचे काम लोकांना सांगण्याची वेळ विरोधकांवर आली आहे.

अनेक वर्षे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न आहे. एक औद्योगिक वसाहत येथील लोकप्रतिनीधींना आणता आली नाही. साडेसात वर्षे मंत्री होते. पण ना.विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील औद्योगिक वसाहतीकरिता पाचशे एकर जागा मंजूर करून आणली. आता उद्योग येण्यास प्रारंभ झाला आहे. विकास प्रक्रीयेच्या जोरावरच जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये युवकांनी विजय घडवला. आता तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या सहकार्याने असेच परीवर्तन आपल्याला घडवायचे आहे. तुमच्या पाहुण्यांंना आणून येथील विकास काम दाखवा आणि आता नातेवाईकांना हळूहळू फोन करायला सुरूवात करा, असे सूचक वक्तव्य करून पुन्हा संगमनेरातून लढण्याचे डॉ. विखे यांनी संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...