पुणे । Pune
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी कएलोयचा आरोप त्यांच्यावर होता.
वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण व त्यामुळे रूग्णालाय प्रतिमेला निर्माण होणारी हानी पाहता घैसास यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. रूग्णसेवा हे माझे प्रथम कर्तव्य असून, त्यामध्ये अडचण येऊ नये हीच माझी भूमिका असल्याचे डॉक्टर घैसास म्हणाले. सध्या मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारावर चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.