राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी ११६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून २१ जागांसाठी ५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे जनसेवा मंडळ, शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.
डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी जवळपास १७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भाजप महायुती प्रणित परिवर्तन मंडळाच्या सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तसेच कारखाना बचाव कृती समितीच्या काही उमेदवारांनी श्रेष्ठींचा विचार न घेता लवकर उमेदवारी अर्ज काढल्याने काही ठिकाणी कृती समितीला उमेदवार मिळाले नाही.
सर्वसाधारण मतदार संघामधून कोल्हार गट-जनसेवा मंडळाचे अशोक ज्ञानदेव उन्हे, ज्ञानेश्वर भास्कर कोळसे तर शेतकरी विकास मंडळाचे मच्छिंद्र गजानन कोळसे, गोरक्षनाथ केशव घाडगे हे निवडणूक रिंगणात आहेत. देवळाली प्रवरा गट- जनसेवा मंडळाचे अरुण कोंडीराम दुस, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, भारत नानासाहेब हेिब वारुळे तर शेतकरी विकास मंडळाचे चंद्रकांत माधवराव आढाव, गोरक्षनाथ लक्ष्मण चव्हाण, गणेश राजेंद्र मुसमाडे तसेच कृती समितीचे आप्पासाहेब भीमराज ढुस, सुखदेव माधवराव मुसमाडे, सोमनाथ लक्ष्मण वाकडे हे निवडणूक लढवित आहेत. टाकळीमिया गट- जनसेवा मंडळाचे मीना सुरेश करपे, ज्ञानेश्वर बळीराम खुळे, ज्ञानेश्वर हरी पवार, तर शेतकरी विकास मंडळाचे सुभाष भास्कर जुंदरे, चंद्रकांत भास्कर पवार, पोपट दगडू पोटे तसेच कृति समितीचे संजय सयराम पोटे, सुधाकर भाऊसाहेब शिंदे हे निवडणूक लढवित आहेत. आरडगाव गट जनसेवा मंडळाचे प्रमोद रावसाहेब तारडे, सुनील भानुदास मोरे, वैशाली भारत तारडे, तर शेतकरी विकास मंडळाचे मधुकर सिताराम तारडे, दिनकर कुंडलिक बनकर, दत्तात्रय अण्णासाहेब म्हसे तसेच कृति समितीचे अनिल भाऊसाहेब कल्हापुरे, अरुण बिरुदेव डोंगरे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
वांबोरी गट- जनसेवा मंडळाचे किसन कारभारी जवरे, भास्कर जगन्नाथ ढोकणे तर शेतकरी विकास मंडळाचे रावसाहेब गोपीनाथ गडाख, भास्कर मुरलीधर सोनवणे यांनी आपली उमेद्वारी ठेवली आहे. राहरी गट- जनसेवा मंडळाचे अरुण बाबुराव तनपुरे, जनार्दन लक्ष्मण गाडे तर शेतकरी विकास मंडळाचे नवनाथ आप्पासाहेब कोहोकडे, कैलास नवनाथ गाडे तसेच कृति समितीचे अरुण चंद्रभान गाडे, सुभाष लक्ष्मण डौले उमेद्वार असून राधाकिसन माधव येवले हे अपक्ष निवडणूक लढवित आहे.
सहकारी संस्था (ब वर्ग) जनसेवा मंडळाचे गटातून हर्ष अरुण तनपुरे, तर शेतकरी विकास मंडळाचे रायभान मुरलीधर काळे मैदानात उतरले आहेत. अनुसूचित जाती जमाती -जनसेवा मंडळाचे अरुण नानासाहेब ठोकळे तर शेतकरी विकास मंडळाचे नामदेव दगडू झारेकर व कृति समितीचे हरिभाऊ गुंडाजी खामकर हे निवडणूक रिंगणात आहेत.
महिला प्रतिनिधी- जनसेवा मंडळाच्या सपना प्रकाश भुजाडी, जनाबाई धोंडीराम सोनवणे तर शेतकरी विकास मंडळाच्या लिलाबाई लक्ष्मण येवले, कौशल्याबाई चिमाजी शेटे तसेच कृति समितीच्या शैलजा अमृत धुमाळ, लताबाई गुलाबराव पवार यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्ग – रावसाहेब यादवराव तनपुरे तर शेतकरी विकास मंडळाकडून सुरेश महादू शिरसाट व कृति समितीकडून दिलीप दादासाहेब इंगळे हे रिंगणात उतरले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग जनसेवा मंडळाकडून अशोक सिताराम तमनर व शेतकरी विकास मंडळाकडून अण्णा लक्ष्मण विटनोर हे उमेदवार रिंगणात आहेत.
डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृती समितीच्या अजित कदम व भारत पेरणे तसेच इतर काही उमेदवारांनी श्रेष्ठींशी काहीही विचारविनिमय न करता आपले उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने काही गटात कृती समितीला उमेदवार कमी पडले. त्यामुळे कृती समितीला संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी अवघे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करता आले. अशी चर्चा कृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.