Wednesday, December 4, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखाना खाजगी किंवा उद्योगपतीच्या घशात जाण्यापासून वाचवा

डॉ. तनपुरे कारखाना खाजगी किंवा उद्योगपतीच्या घशात जाण्यापासून वाचवा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार व बाजारपेठेची कामधेनू असलेल्या राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्यावरील जिल्हा बँकेची जप्ती कारवाई त्वरीत थांबवून हा कारखान्याच्या खाजगी किंवा उद्योगपतीच्या घशात जाण्यापासून वाचवावा. यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आजी, माजी संचालकांनी एकजुटीने व राजकाराण विरहीत प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, राजू शेटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू, अ‍ॅड. पंढरीनाथ पवार यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सर्वपक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधींना केले आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना, खा. डॉ. सुजय विखे केंद्रात लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे पिताश्री या जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार क्षेत्रातील वजनदार मंत्री आहेेत. मा. आ. शिवाजीराव कर्डिले 10 वर्षे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते. व पुढील काळातही त्यांचा प्रयत्न राहणार आहेत. जिल्हा बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे मा. खा. प्रसाद तनपुरे यांचेही राज्याच्या नेतृत्वाकडे चांगले वजन आहे. त्यांचे बंधू अरुण तनपुरे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. तर आ. प्राजक्त तनपुरे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेतच. माजी आ. चंद्रशेखर कदम यांचेही भाजपातील केंद्र व राज्यातील नेत्यांकडे चांगले वजन आहे.

यासर्व शक्ती एकत्र येऊन हा कारखाना बँकेच्या जप्तीतून वाचाविताना कोणा खाजगी व्यक्ती व संस्थेच्या घशात जाण्यापेक्षा त्वरीत निवडणूक घेऊन संचालक मंडळाला चालविण्यास द्यावा. तालुक्यातील ऊस उत्पादक, कामगार, सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत. नाहीतरी बँकेकडून चालविण्यास घेणार्‍याकडून कितपत कर्ज परतफेड होणार आहे. त्यासाठी बँकेने केलेली कारवाई मागे घेण्याची विनंती या सर्वपक्षिय नेत्यांनी बँकेकडे करून 15 वर्षाचे हप्ते पाडून घेतल्यास हा कारखाना उर्जितावस्थेत येण्यास वेळ लागणार नाही. फक्त राजकारण बाजूला ठेऊन कामधेनू डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करावेत व राहुरीतील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांचे प्रपंच वाचविण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा बँकेचे जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील प्रत्येक कारखान्याकडे 100 कोटींपासून 800 कोटी रुपयांपर्यंत कर्ज असताना राहुरी कारखान्यावर जप्तीचा ठराव करताना यासाठी आता सर्वपक्षिय प्रयत्नांची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे डॉ. विखे व इतरांनी प्रामाणिकपणे केंद्र शासनाकडे प्रयत्न करून कारखान्यास मदत मिळवावी. त्याप्रमाणे राज्यातील नेत्यांनीही यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी कारखाना बचाव कृती समितीकडून करण्यात आले आहे.

कारखान्याकडे कार्यक्षेत्रातच 20 कि.मी च्या आत 15 ते 17 लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. त्यातून वाहतूक खर्च वाचेल. निळवंडेचे पाणी आल्यावर डोंगर भागातील गावांतून तीन ते साडे तीन मे. टन ऊस वाढणार आहे. कारखाना काटकसरीने चालविल्यास यातून सर्व देणी देऊन कामधेनू नक्किच उर्जित अवस्थेत येऊन कारखाना गतवैभवास येईल, असा विश्वास व्यक्त करताना आज कारखान्याची 1 हजार कोटींच्यावर मालमत्ता आहे. सलग्न शिक्षण संस्था आहे. या सर्व संस्था व कारखाना जगविण्यासाठी सर्व पक्षिय नेत्यांनी जिल्हा बँकेला विनंती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संदीप आढाव, राम शिंदे, राहुल तमनर, रेवन्नाथ बाचकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या