पुणे | Pune
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (98th Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली .
हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “पहिल्या यादीत मला उमेदवारी न दिल्यास…”; शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार खोसकरांचा काँग्रेसला इशारा
संयुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली (Delhi) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.यंदा २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर हे साहित्य संमेलन होणार आहे.
हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती
डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या त्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. त्यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचे लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केले आहे.
हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे जड?
दरम्यान, गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र काही कारणास्तव दिल्लीला संमेलन होऊ शकले नाही. यंदा मात्र सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन आयोजनाचा मान मिळाला. याआधी १९५४ मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (Laxman Shastri Joshi) यांनी भूषविले होते. आता ७० वर्षांनंतर पुन्हा दिल्लीत येत्या फेब्रुवारीमध्ये ९८ वे साहित्य संमेलन होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा