Saturday, May 4, 2024
Homeनाशिकडॉ. अतुल वडगांवकर यांना ‘मानवधन सेवा गौरव' पुरस्कार

डॉ. अतुल वडगांवकर यांना ‘मानवधन सेवा गौरव’ पुरस्कार

इंदिरानगर । वार्ताहर Indiranagar

सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवाकार्य करणार्‍या गुणीजनांचा मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक दरवर्षी ‘मानवधन सेवा गौरव’ पुरस्काराने( Manavdhan Seva Gaurav Puraskar) सन्मान करीत असते. या वर्षी हा पुरस्कार करोनाकाळात ( Corona )सामान्यांसाठी प्राणदूत ठरलेले नाशिकचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. अतुल वडगांवकर ( Dr. Atul Vadgaonkar)यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

पुरस्कार मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे आणि संस्था सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल वडगांवकर सपत्निक उपस्थित होत्या. 2020-21 मध्ये उद्भवलेल्या करोनाजन्य प्रादुर्भावात रूग्णांना यथायोग्य सेवा देत पंचसूत्री उपचार पद्धती व चिकित्सा देऊन 3000 वर करोना संक्रमित रुग्णांना बरे करणारे, कमीत कमी खर्चात घरीच करोना रुग्णाचा आजार घालवणारे, ओपन क्लिनीक संकल्पना प्रत्यक्षात कृतीत आणत कोरोनाची भिती त्यांनी घालवली.

आरोग्यासंबंधीची मार्गदर्शन शिबिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत, होतकरू तरुणांसाठी मोफत वसतीगृह व मार्गदर्शन व उद्बोधन वर्ग यांसारखे भरीव कार्य करून डॉ. अतुल वडगांवकर यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कृत केले आहे. सूत्रसंचालन अपर्णा कुलकर्णी तर आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक सुरेखा निकम, वैशाली पवार, प्रदीप देवरे, उपमुख्याध्यापिका पूनम पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या