Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीच्या मंत्र्यांमध्ये रंगले मानापमान नाट्य; 'आपल्या मर्यादा लक्षात ठेवा', शिरसाटांच्या 'त्या' पत्राला...

महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रंगले मानापमान नाट्य; ‘आपल्या मर्यादा लक्षात ठेवा’, शिरसाटांच्या ‘त्या’ पत्राला माधुरी मिसाळांनी लावलं उडवून

मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोलले जातेय. निधी वाटप आणि इतर काही अधिकारांवरून महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे बघायला मिळत आहेत. त्यातच आता महायुतीमधील शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून येते. माधुरी मिसाळ यांनी विभागीय बैठक घेतली त्यामुळे नाराज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उघडपणे नाराजीचे पत्र मिसाळ यांना पाठवून यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घ्या असे त्यांना बजावले आहे. त्यामुळे बैठक घेण्याचा मलाही अधिकार आहे असे उत्तर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना दिले आहे.

नेमके काय घडले?
राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी अलीकडेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना विचारात न घेता, एक बैठक घेतली होती. यावरून शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट मिसाळ यांना पत्र लिहून ‘आपल्या मर्यादा लक्षात ठेवा’ असे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केला. शिवाय अशाप्रकारची कोणतीही बैठक घ्यायची असेल तर माझी पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच अशा बैठका आपल्याच अध्यक्षतेखाली व्हाव्यात असेही शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या पत्रानंतर मिसाळ यांनी देखील पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. अशाप्रकारे बैठका घेण्यासाठी मला कुणाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या नाराजीनाट्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मला २ दिवसापूर्वी हे पत्र मिळाले. हे पत्र वाचून मलाही आश्चर्य वाटले. माझ्याकडे जितकी खाती आहेत त्याच्या बैठका सुरू आहेत. मी प्रशासनासोबत खात्याची बैठक घेणे हा माझा अधिकार आहे. मंत्र्यांच्या अधिकारात मी कुठलीही ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही बैठकीत मी निर्णय दिले नाहीत. त्यामुळे मी मंत्र्यांच्या अधिकाराचे कुठेही उल्लंघन केले असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विभागवार आढावा घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार खात्यांच्या बैठका सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.

YouTube video player

तसेच माझ्याकडून काही चूक होत असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही मी पत्र पाठवले आहे. या प्रकाराबाबत मला जो काही निर्देश द्यायचा असेल मुख्यमंत्री देतील. त्याप्रमाणे मी त्यांच्या आदेशाचे पालन करेल. शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला मी उत्तर दिले आहे. खात्याची बैठक घेणे हा माझाही अधिकार आहे. खात्याच्या कारभारात माझ्याही काही सूचना असू शकतात. त्याप्रमाणे मी बैठका घेते. मी शिरसाट यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले नाही. माझे कुणाशी वैयक्तिक बोलणे झाले नाही. शिरसाट यांचे पत्र मिळाल्यानंतर मी माझा खुलासा पाठवला असंही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटले.

या पत्रासोबत त्यांनी शिरसाट यांनी लिहिलेले पत्र देखील मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याबाबतचे पुढील आदेश घेण्यात येतील’, असेही मिसाळ यांनी म्हटले. आता या दोन मंत्र्यांमधील वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशाप्रकारे सोडवणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

स्टॉक

Nashik Crime News: स्टॉक मार्केटला भुलले अन् जाळ्यात अडकले; सहा नाशिककरांचे...

0
नाशिक | प्रतिनिधीशहरातील सहा ‘शिक्षित' व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्तनागरिकांना सायबर संशयितांनी टार्गेट करुन ‘स्टॉक मार्केट’ मधून अधिक नफा देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ४३...