भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल IPL च्या १३ व्या हंगामासाठी VIVO ची असलेली स्पॉन्सरशिप बीसीसीआय BCCI ने एका वर्षासाठी स्थगित केली होती. या स्पॉन्सरशिपसाठी अनेक कंपन्या उत्युसक होत्या. यामध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स, बाबा रामदेव यांची पंताजली यांचा समावेश होता. Dream 11 ने २२२ कोटी मोजत एका वर्षासाठी आयपीएल IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रृजेश पटेल यांनी ही माहिती दिली.
IPL च्या १३ व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना बीसीसीआय BCCI ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे BCCI ने आधीच स्पष्ट केले होते. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआय BCCI ने स्पष्ट केले होते.