Friday, June 13, 2025
Homeनगरपाणी उकळून व गाळून प्यावे

पाणी उकळून व गाळून प्यावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर शहर परिसरात पिण्याचे पाण्याचे पाईपलाईनला गळती होत असल्यास व अशुद्ध पाणी नळास येत असल्यास त्वरीत नगरपरिषदेस कळवावे. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी उकळून, गाळून, थंड करुनच प्यावे, जेणेकरुन जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

काही दिवसात पावसाळा सुरु होणार असल्याने डास वाढण्याचा संभव असून त्यातून डेंग्यु, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया सदृश्य रुग्ण आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यु, चिकणगुणीयाचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. यासाठी आपल्या शहरात या आजाराचा प्रादुर्भाव होवु नये, म्हणून नागरीकांनी आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण आठवड्यातून एकदा कोरड्या करून तासभर सुकवुनच पुनःश्च पाणी भरावे, घराभोवती पाण्याचे डबके साचू देवू नये, फ्लॉवर पॉटमधील पाणी दर तीन दिवसांनी बदलावे, टायरचे पंक्चर काढणार्‍या व्यावसायिकांनी दररोज पंक्चरचे पाणी बदलावे व निकामी टायर्सची विव्हेवाट लावावी.

चांगले टायर्स बंदीस्त खोलीत ठेवावे, काही नागरीकांनी, स्वयंसेवी संस्था यांनी मोकाट जनावरांना पाणी पिण्यासाठी पिण्याचे हौद केलेले आहेत त्यांनीही सदर पाण्याचे हौद आठवड्यातून एकदा साफ करून कोरडे करावेत. कुलरमधील व फ्रिज मधील पाणी वरचेवर बदलावे व घराची तसेच परिसरातील साफसफाई व स्वच्छता ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच शौचालयाचे गॅस पाईपला जाळी, पातळ कापड लावावे जेणेकरून सदर पाईपामध्ये डासांचा शिरकाव होणार नाही.

आपल्या घराभोवती असलेल्या पाण्याच्या हौदाच्या टाकीत गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे दर गुरुवारी 4 ते 6 या वेळेत पुरविण्याची व्यवस्था कामगार हॉस्पिटल उद्यानामध्ये करण्यात आलेली आहे. सदर गप्पी मासे देण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात संपर्क साधावा. शहरातील सर्व नागरिकांनी सुचनांची दखल घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...