Monday, June 17, 2024
Homeनाशिकघरफोडीप्रकरणी वाहनचालक अटकेत; 17 लाखाचा एैवज जप्त

घरफोडीप्रकरणी वाहनचालक अटकेत; 17 लाखाचा एैवज जप्त

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

येथील बारा बंगला भागातील डॉक्टर कुटूंबियांसह (Doctor family) पर्यटनास (Tourism) गेले असल्याची संधी साधत त्यांच्या निवासस्थानी बनावट चावीने (fake keys) घरफोडी करत लाखो रूपयांचा एैवज लंपास करणारा चोरटा डॉक्टरांचा चालकच निघाला आहे.

द्याने येथील वाल्मिक कैलास पाटील या वाहन चालकास (Driver) पोलिसांनी शिताफीने अटक करीत त्याच्याकडून 17 लाख 5 हजार रूपयांचा एैवज जप्त केला आहे. अवघ्या महिनाभरात या घरफोडीचा छडा लावण्यात यश आल्याने पोलीस यंत्रणेस (Police system) दिलासा मिळाला आहे. येथील बारा बंगला भागातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिलीप भामरे (Gynecologist Dr. Dilip Bhamre) यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये (Navjivan Hospital) 30 नोव्हेंबररोजी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता.

भामरे कुटूंबियांसह गोवा येथे पर्यटनास गेले होते. त्यामुळे घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बनावट चावीव्दारे घर व तिजोरीचे कुलूप (Lock) उघडून सुमारे 20 लाखाचा एैवज लंपास केला होता. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi), उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव (Deputy Superintendent Pradeep Kumar Jadhav) यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

चोरीची पध्दत लक्षात घेत संशयित चोरटा भामरे कुटूंबियांशी संबंधित असावा असा संशय असल्याने त्या दृष्टीकोनातून तपास करण्याचे निर्देश जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिले होते. उपअधिक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवा. मोठाभाऊ जाधव,

वासुदेव नेमणार, विजय घोडेस्वार, कैलास सोनवणे, संजय पाटील, नितीन बाराहाते आदींच्या पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मो. सायकल तसेच गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून डॉक्टरांचा पुर्वाश्रमीचा चालक वाल्मिक पाटील यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली होती. प्रारंभी काही सांगण्यास नकार देणार्‍या वाल्मिक यास पोलीसी खाक्या दाखविला जाताच तो पोपटासारखा बोलू लागला.

बनावट चावी तयार करून ही घरफोडी केल्याची कबुली त्याने दिलीच तसेच यापुर्वी देखील डॉक्टरांच्या निवासस्थातून एक हिर्‍याचा व एक मोत्याचा हार चोरल्याचे देखील सांगितले. पोलिसांनी वाल्मिक याच्याकडून सोन्याचे तसेच हिरे व प्लॅटीनमचे दागिने असा सुमारे 17 लाखांचा एैवज जप्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या