Friday, March 14, 2025
Homeनाशिकतहसील कार्यालयातील वाहनचालक दीड लाखांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

तहसील कार्यालयातील वाहनचालक दीड लाखांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील तहसील कार्यालयातील (Tehsil Office) वाहनचालकाला दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption Department) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी (Igatpuri) येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती. शेतजमीन संदर्भात तात्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. त्यापैकी ५० हजार रुपये दिले होते.

त्यानंतर उरलेली दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना वाहनचालक अनिल बाबुराव आगीवले (वय ४४) नेमणूक तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर, संलग्न उपविभागीय कार्यालय इगतपुरी त्र्यंबकेश्वर (शासकीय वाहन चालक) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे यापूर्वी देखील या वाहनचालकाने ५० हजारांची लाच घेतली होती.

दरम्यान, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे सोने चोरणारी संगमनेर आणि अकोलेची टोळी जेरबंद

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner काकडवाडी (ता. संगमनेर) येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना...