Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedयाठिकाणी ड्रोन उडवल्यास जेलची हवा!

याठिकाणी ड्रोन उडवल्यास जेलची हवा!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

जी २० परिषदेनिमित्त (G20) आंतरराष्ट्रीय तसेच विविध देशातील प्रतिनिधी २७ आणि २८ फेब्रुवारी या काळात छत्रपती संभाजीनगर शहरात असणार आहेत. यामुळे शहरभरात कुठेही ड्रोनद्वारे चित्रिकरण (drone) करण्यास बंदी करण्यात आली आहे. पोलीस (police) आयुक्‍त डॉ.निखिल गुप्ता यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश २ मार्चपर्यंत लागू असणार आहे.

- Advertisement -

जी-२० परिषदेदरम्यान विविध देशातील तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी हे शहरातील वारसा स्थळांना भेटी देणार आहेत. दरम्यान, त्यांच्या हॉटेल ताज विवांता या राहण्याच्या ठिकाणासह बीबी का मकबरा, विद्यापीठ लेणी आदी वारसा स्थळे तसेच पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोनने चित्रीकरण करू नये, कोणत्याही कारणास्तव ड्रोन उडवून नये, असे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आदेश काढले आहेत. ड्रोन कॅमेर्‍याद्वारे घातापाताची शक्‍यता नाकारता येत नाही, तसेच आंतरराष्ट्रीय सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही आदेशात म्हटले आहे. हा आदेश हे २५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत असणार आहेत. या आदेशाचा भंग केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या