Wednesday, June 26, 2024
Homeनगरदुष्काळी सावटात गणपतीबप्पा फुल उत्पादकांना पावले

दुष्काळी सावटात गणपतीबप्पा फुल उत्पादकांना पावले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या गणेश उत्सवामुळे फुल उत्पादकाना थोडा दिलासा मिळाला असुन सण उत्सवामुळे फूल बाजार वधारला आहे. मागील आठ दिवसापर्यत मातीमोल भावाने विकले जात आसलेल्या फुलांचे गणेशोत्सव काळात बाजार वाढल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पारनेर तालुक्यात चालु वर्षी पाऊस खुपच अत्यल्प झाला आसल्याने शेतकर्‍यांनी तिळ तिळ पाणी भरुन फुलपिके जगवली. परंतु मागील काही दिवसांत फुलाचे दर इतके खाली आले होते की त्यांना किलोला पाच रुपयाचाही दर मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी उभ्या पिकात रोटर फिरवले होते.

याबाबत फुल व्यापारी शंशिकात झंजाड व एकनाथ औचिते यांनी सांगितले कि गेल्या दोन तीन दिवसापासून फुलाना चांगला दर मिळत आहे . बुधवारी बाजारात शेवंती 80 ते 100 रुपये किलो, झेंडू 30 ते 50 रुपये किलो, आष्टर 80 ते 100 रुपये किलो, गुलाब 250 ते300 रुपये किलो, तर गुलझडी 600 रुपये, गजर्‍याचे मोगरा, कागडा ही फुले 500 ते 600 रुपये किलो दराने विकली जात आहेत.

गणेश उत्सवानंतर गौराई, पुढे नवरात्रोत्सव, दसरा व पुढे दिपावली उत्सव सलग आसल्याने शेतकर्‍यांना यापुढे अशेच बाजारभाव टिकून राहातील अशी अपेक्षा आहे.गेल्या महिन्यात जेथे शेतकरी उभ्या मालात रोटर फिरवत होते तेथे आज गणपती बप्पाच्या आगमनाने थोडे बाजारभाव समाधानकारक झाल्याने ऐकप्रकारे गणपती बप्पाच फुल उत्पादकाना पावल्याचेचित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या