Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनदीत बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

चिंचखेड | वार्ताहर | Chinchkhed

चिंचखेड गावाच्या शिवारातील साकोरपाडा वस्ती येथे कादवा नदीच्या (Kadwa River) पात्रातील पाण्यात अर्जुन बबन वाघ (Arjun Baban Wagh) (३५, रा. साकुरपाडा वस्ती चिंचखेड शिवार, ता. दिंडोरी) हा बुडालेला होता. त्याचा मृतदेह (Deadbody) शोधण्यात आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांना (Police) यश आले आहे…

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, चिंचखेड येथील महादेव वाडी परिसरात राहणारा अर्जुन बबन वाघ हा तरुण सोमवार 26 सप्टेंबर रोजी किराणा आणण्यासाठी शेजारील साकोरे गावात गेला होता, चिंचखेड आणि साकोरे या दोन गावांच्या मध्ये कादवा नदी आहे,

साकोरे येथून किराणा घेऊन येताना पाण्यातील ट्यूबवरून तोल गेल्याने सदरील युवक हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, कादवा नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या युवकाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अपयश आले.

हा युवक बुडाला त्यावेळी तेथील एका स्थानिक नागरिकानी बघितले होते, त्यानंतर घटना बघितलेल्या युवकांनी तेथील वस्तीवर आरडाओरड करून नागरिकांना जमा केले, पण बुडालेल्या युवकाचा शोध लागत नव्हता.

कोथिंबिरीला वीस हजार रुपये विक्रमी भाव

घटनेची माहिती वणी पोलीस ठाण्याला देण्यात आली. सोमवारी वणी पोलिसांनी तसेच स्थानिक पोहणाऱ्यांनी बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री उशिरापर्यंत हा युवक सापडला नाही.

Navratrotsav 2022 : सप्तशृंगी देवीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

मंगळवारी सकाळी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच चांदोरी येथील सागर रंगनाथ गडाख यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम राबवून सदरील युवकाचा मृतदेह शोधून काढला.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

या शोध मोहिमेत वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस हवालदार माणिक नागरे, पोलीस नाईक जगदीश झाडे, प्रदीप शिंदे,अंमलदार शाम राऊत, सहभागी होते. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या