Thursday, April 3, 2025
HomeमनोरंजनDrugs Case : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर

Drugs Case : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

अभिनेत्रीरिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने आज (2 डिसेंबर) शौविकच्या जामिनावर सुनावणी घेत त्याला जामीन दिला आहे. शौविक मागील 2 महिन्यांपासून कारागृहात आहे.

- Advertisement -

शौविकनेही मुंबई उच्च न्यायालय, मुंबई सत्र न्यायालयाने वारंवार जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला जामीन नामंजूर करण्यात आला होता. आज अखेर शौविकची सुटका करण्यात आली आहे. 50 हजारांंच्या जात मुचलक्यावर ही सुटका करण्यात आली आहे. त्याला पासपोर्ट सादर करावा लागणार आहे.

रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता. शौविक चक्रवर्तीने 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. शौविकला ड्रग्ज बाळगणं, खरेदी करणं आणि विक्री करणं अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्सची विक्री करणारा तरुण गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur नशेच्या गोळया व इंजेक्शन्सची विक्री करणार्‍या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलीसांनी अटक केली.त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच 16 मोबाईल जप्त...