Wednesday, May 29, 2024
Homeदेश विदेशमोठी कारवाई! बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक

मोठी कारवाई! बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक

गुजरात | Gujarat

गुजरातच्या कच्छमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी इंडियन कोस्ट गार्डने ओखा जवळ एका इराणी नावेतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे….

- Advertisement -

या बोटीतून ६१ किलोंचे हेरॉईन तस्करी करत नेले जात होते. बोटीतील ड्रग्जबाबत गुजरात अँटी टेरिरीस्ट स्क्वाडला गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने दोन गस्त घालणाऱ्या जहाजांद्वारे ही कारवाई केली आहे.

रात्री उशिरा ओखा किनाऱ्यापासून ३४० किमी दूर भारताच्या जल सीमा क्षेत्रात एक संशयित बोट दिसली. आयसीजीच्या जहाजांनी त्या बोटीला थांबण्यास सांगितले. मात्र तेव्हा इराणी बोटीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

धुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

त्याचवेळी तटरक्षक दलाने ही महत्त्वाची कारवाई केली आहे. या बोटीत इराणी नागरिक होते. त्यांच्याकडे इराणची नागरिकता असल्याचा पुरावा मिळाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पाच सदस्य आणि चालकासह ही इराणी नाव पकडण्यात आली आहे. या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. या बोटीवर 425 कोटी किंमतीचे ६१ किलो हेरॉईन आढळून आले. हे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या