Monday, May 20, 2024
Homeनगरदारुच्या नशेत कार चालवून दोन वाहनांना उडवले

दारुच्या नशेत कार चालवून दोन वाहनांना उडवले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

भरधाव वेगाने जाणार्‍या ईरटीका कारने वेगवेगळ्या वाहनांना धडक दिल्याने झालेले अपघातामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील सह्याद्री विद्यालयाजवळ घडली. या अपघातामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले. दारूच्या नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवणार्‍या कार चालकाला काही नागरिकांनी पाठलाग करून पकडले.

- Advertisement -

काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक येथून एक कार चालक भरधाव वेगाने संगमनेर शहराकडे येत होता. तो दारूच्या नशेत ईरटीका कार (क्र. एम एच 16 बी.एच. 7325) चालवत होता. त्याने नाशिक -पुणे महामार्गावर एका महाविद्यालयीन युवतीच्या एक्टिवा गाडीला धडक दिली.

याशिवाय अन्य दोन वाहनांनाही त्याने धडक दिली. या अपघातात पृथ्वी पवार, देवेंद्र मोढे व गोरख दत्तू शिंदे (राहणार घुलेवाडी) हे जखमी झाले. या अपघातामध्ये दोन वाहनाचे नुकसान झाले. कारचालक दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला अडवले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

या अपघातामध्ये गोरख दत्तू शिंदे (राहणार घुलेवाडी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 606/2023 भारतीय दंड संहिता कलम 279, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 185, 134 अ, ब, 177 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या