Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रझिंगाट महिलेचा विमानात धिंगाणा; कपडे काढून क्रू मेंबरला मारहाण

झिंगाट महिलेचा विमानात धिंगाणा; कपडे काढून क्रू मेंबरला मारहाण

मुंबई | Mumbai

- Advertisement -

सोमवारी अबूधाबीवरून (Abu Dhabi) मुंबईला येणाऱ्या विमानात (Flight) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका इटालियन प्रवासी महिलेने स्वतःकडे इकॉनॉमी क्लासचे तिकीट असूनही बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह केला. यावेळी केबिन क्रूने तिला विरोध केल्यावर तिने केबिन क्रूवरच हल्ला केला. त्यानंतर महिलेने स्वतःचे काही कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ती विमानाच्या सीट्सच्या मधल्या जागेतून फिरली….

प्राथमिक चौकशीनंतर मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात (Sahara Police Station) तिच्याविरुद्ध केस दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. ‘एअर विस्तारा’च्या यूके 256 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबीवरून विमानाने उड्डाण भरले. विमान पहाटे 4.53 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

आजचे दिनविशेष (दि. ३१ जानेवारी २०२३)

याबाबत अधिक माहिती अशी की, विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेली ही महिला अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक उठून बिझनेस क्लासमधल्या सीटवर जाऊन बसली. केबिन क्रूमधल्या दोघांनी जाऊन तिची चौकशी केली. काही मदत हवी आहे का? असे महिलेला विचारण्यात आले. यावर महिलेने काहीच उत्तर दिले नाही. यामुळे क्रूने तिला स्वतःच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली.

यावेळी तिने आरडाओरडा केली आणि केबिन क्रूशी गैरवर्तन केले. जेव्हा क्रू मेंबर्सनी तिला रोखायचा प्रयत्न केला, तेव्हा तिने एकाच्या चेहऱ्यावर ठोसा मारला, तर दुसऱ्याला चापटी मारली. यानंतर बाकीचे क्रू मेंबर्सदेखील तिथे आले. तेव्हा त्या महिलेने स्वतःचे कपडे उतरवायला सुरुवात केली.

पदवीधर निवडणूक विश्लेषण: नाशिकमध्ये तांबे बाजी मारणार की आघाडीला मिळणार यश

ती महिला अर्धनग्नावस्थेत सीट्सच्या मधल्या जागेतून फेऱ्या मारू लागली. त्यामुळे केबिन क्रू आणि अन्य प्रवाशांनाही धक्काच बसला. विमान मुंबईत उतरल्यानंतर त्या महिलेला एअर विस्ताराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. केबिन क्रूकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या