Saturday, May 4, 2024
Homeनगरडीटीएड प्रथम वर्षाचे विद्यार्थी पुढील वर्गात जाणार

डीटीएड प्रथम वर्षाचे विद्यार्थी पुढील वर्गात जाणार

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

करोना पार्श्वभूमीवरती विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दबातल करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती शिक्षक होण्यासाठीच्या डी.टी.एड प्रथम वर्षात शिकत

- Advertisement -

असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिले आहेत.

डी. टी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा यापूर्वी घेण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. जून महिन्यात होणार्‍या या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

तर द्वितीय वर्षाच्या संदर्भाने परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

द्वितीय वर्षाच्या परीक्षा 20 जानेवारीपासून नियोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा प्रत्यक्ष होणार असून ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

अशी होणार परीक्षा

20 जानेवारीला भारतीय समाज आणि शिक्षण, 21 जानेवारी शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व परिवर्तन, 22 जानेवारी शिक्षणातील नवीन विचार प्रवाह, 23 जानेवारी इंग्रजी भाषा संप्रेषण व प्रभुत्व मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व, 25 जानेवारी रोजी द्वितीय भाषा अध्ययन अध्यापन शास्त्र, 27 जानेवारी इंग्रजी अध्ययन अध्यापन शास्त्र, 28 जानेवारी विज्ञान व गणित अध्ययन अध्यापन शास्त्र 29 जानेवारी सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र या स्वरूपात परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या