Friday, October 2, 2026
HomeनगरShirdi : दुबईच्या साईभक्ताचे 270 ग्रॅम वजनाचे सोने दान

Shirdi : दुबईच्या साईभक्ताचे 270 ग्रॅम वजनाचे सोने दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या (Sai Baba) चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात. सोमवार 12 मे रोजी दुबई (Dubai) येथील एका साईभक्ताने (Sai Devotee) 270 ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ॐ साई (Om Sai Gold Name)  हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले.

- Advertisement -

या सुवर्ण दानाची (Gold Donate) किंमत 24 लाख 840 रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. हे सुवर्ण ॐ साई नाव संस्थानकडे सुपुर्द केल्यानंतर द्वारकामाई येथे बसविण्यात आले. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....