नाशिक | Nashik
शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत रात्रीपासून पावसाचा (Rain) जोर वाढला असून धरणांच्या (Dam) पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून दुपारी १ वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे…
- Advertisement -
गंगापूर धरण (Gangapur Dam) क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असून पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून दुपारी १ वाजता ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
Video : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.