नाशिक । प्रतिनिधी Nashik
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील तब्बल 58 हजार 332 पेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून आर्थिक लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींची यंदाची भाऊबीज दुसर्या एका लाडक्या बहिणीनेच म्हणजेच देवयानीताईंनीच सुखद केल्याचा अनुभव यानिमित्ताने येत आहे.
‘लाडकी बहिण’ योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यांत थेट निधी जमा झाला आहे, मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्या आपले घर चालवू शकत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. त्यांच्या मनात आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणादरम्यान या योजनेमुळे महिलांचे जीवन अधिक उत्साहपूर्ण झाले आहे. यावर्षी त्यांच्यासाठी ही भाऊबीज सण विशेष ठरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लाडक्या बहिणी आता महायुती सरकारला आणि या सरकारमधील एक घटक असलेल्या आ. फरांदे यांना अधिक बळ देत आहे.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री
नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात आले. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनी अभियानात उत्साहात सहभाग घेतला. उपस्थित महिला भगिनींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने संवाद साधला. ‘लाडकी बहीण’ योजनेतून देण्यात येणारा पैसा हा जनतेचा हक्काचा पैसा आहे आणि तो माता भगिनींना यापुढेही देण्यात येणार, असा निर्धार यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवाय सत्तेवर आल्यावर ही योजना बंद पडू देणार नाही, असे यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी नमूद केले.
लाडक्या बहिणींसाठी फलदायी योजना
*अन्नपूर्णा योजना – महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली आहे. यात पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील.
*ई-रिक्षा – महिलांना स्वयंरोजगार आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतंर्गत राज्यातील 17 शहरात 10 हजार महिलांना अर्थसाहाय्य करण्यात येईल.
- गरोदर मातांसाठी रुग्णवाहिका– गरोदर माता, बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देण्यात येतील.
- बस सवलत – राज्यातील महिलांना महायुती सरकारने बस तिकीटाच्या दरात 50 टक्के सवलत दिली आहे.
- हर घर नल, हर घर जल – महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ’हर घर नल, हर घल जल’ योजनेतर्तंगत उर्वरित टप्प्यातील काम पूर्ण करुन घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवले जाणार आहे.
- अंगणवाडी सेविकांसाठी लाभ– राज्यातील अंगणवाडी सेविकांना, मदतीनस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृ्त्ती, राजीनामा, मृत्यू यासाठी एक लाख रुपये इतका लाभ दिला जात आहे.
- स्टार्टअप योजना– महिला लघुउद्योजकांसाठी ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरु करण्यात आली आहे.
- मातृ वंदन – प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- उच्चशिक्षणासाठी शुल्क – मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती देण्यास सुरुवात झाली आहे.