Wednesday, May 29, 2024
Homeजळगावडबल नाश्ता न दिल्याने कारागृहात बंद्यांमध्ये तुफान हाणामारी

डबल नाश्ता न दिल्याने कारागृहात बंद्यांमध्ये तुफान हाणामारी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कारागृहातील कैद्याला (inmate in a prison) डबल नाश्ता (double breakfast) न दिल्याच्या कारणावरुन बंद्यांमध्ये वाद होवून तुफान हाणामारी (Argument and fight) झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात (District Jail) घडली. याप्रकरणी चार बंद्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश अभिमान देवरे हे जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. त्यांच्याकडे कारागृहातील बंद्यांची मोजणी करुन त्यांना दिलेल्या बॅरेकमध्ये बंद केले जाते. तसेच दररोज सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्यांची पुन्हा मोजणी करुन त्यांना सर्कल परिसरात मोकळे सोडण्याचे काम आहे. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता नेहमीप्रमाणे बॅरेकमधील सर्व बंद्यांना सर्कल परिसरात मोकळे सोडण्यात आले होते. त्यानंतर कारागृहातील स्वयंपाक घरात सकाळी 7 वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीतील बंदी करण युवराज पवार हा इतर बंद्यांना नाश्ता वाटप करीत होता.

डबल नाश्ता न दिल्याने सुरु होता वाद

कारागृहातील कैद्यांना करण पवार हा नाश्ता वाटप करीत होता. त्याने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबारच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोडीत असलेला सतिष मिलींद गायकवाड याला करणने डबल नाश्ता दिला नाही. या कारणावरुन त्यांच्या वाद सुरु होता.

नाश्त्याच्या कारणावरुन वाद झाल्यानंतर सतिष गायकवाड हा बंदी मुलाखत विभागाकडून त्याच्या बॅरेकडे जात होता. यावेळी क्वॉरंटाईन विभागाच्या बॅरेकसमोर जात असतांना करण युवराज पवार व त्याच्यासोबत असलेले विलास चंद्रसिंग पठाण, अर्जुन युवराज पवार हे याठिकाणी आले. त्यांनी सतिष गायकवाड सोबत हुज्जत घालून त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

घटनेत दोघे बंदी जखमी

कारागृहात हाणामारी सुरु असल्याचे कळताच तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पोलीस शिपाई गजानन चव्हाण यांच्यासह इतर बंद्यांनी मिळून त्यांचे भांडण सोडाविले. या घटनेत करण पवार याच्या डाव्या पायाला व हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तर सतिष गायकवाड याच्या तोंडाला मुक्का मार लागला आहे.

जिल्हा रुग्णालयातही झाली होती हाणामारी

काही महिन्यांपुर्वी जिल्हा रुग्णालयात कैदी वार्डात उपचारासाठी सतिष गायकवाड व दशरथ महाजन या दोघ कैद्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. यावेळी गायकवाड गटाने बाहेरुन काही तरुणांना बोलावून घेत बंद्यांला मारहाण केली होती. याप्रकरणाची पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी गंभीर दखल घेवून याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा कारागृहात हाणामारीची घटना घडल्याने पोलिसांकडून याची गंभीर दखल घेतली जात आहे.

...खून्नमधून गुन्ह्याची शक्यता

हाणामारीची घटना घडल्यानंतर दोघ बंद्यांकडून कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाहीत. त्यामुळे भविष्यात या बंद्यांमध्ये पुन्हा भांडण होवून ते खून्नस काढीत एखादा मोठा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याची दाट शक्यता आहे. त्याळे त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी बंदी सतिष मिलींद गायकवाड, करण युवराज पवार, अर्जुन युवराज पवार, विलास चंद्रसिंग पठाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या