Wednesday, June 26, 2024
Homeदेश विदेशIndia vs Canada: दोन्ही देशात इकोनॉमिक वॉर; शिक्षणासोबत व्यापारावर होऊ शकतो गंभीर...

India vs Canada: दोन्ही देशात इकोनॉमिक वॉर; शिक्षणासोबत व्यापारावर होऊ शकतो गंभीर परिणाम

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याची जून महिन्यात कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा करत कॅनडाने भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. यावरुन आता भारत आणि कॅनडा (India And Canada) देशांदरम्यान संबंध ताणले गेले असून दोन्ही देशांदरम्यान वाढत्या तणावामुळे व्यापारी जगतात (Economic Sector Affecting) चिंता वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत जगात कॅनडा नवव्या स्थानावर असून दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक, औद्यागिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यवधींचे करार आहेत. मोठ्या व्यापार भागीदारी असलेल्या देशांमधील राजनैतिक स्तरावर सुरू असलेल्या वादामुळे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्याकडून तिथे केलेल्या प्रचंड गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास ही केवळ भारतीय कंपन्यांसाठीच नव्हे, तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठीही (Canada Economy) चिंतेची बाब ठरेल, कारण या कंपन्यांमध्ये कॅनडातील हजारो लोक काम करतात.

भारत आणि कॅनडामध्ये कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत अनेक अब्जाची गुंतवणूक आहे. सर्वाधिक परिणाम एज्युकेशन सेक्टरवर होऊ शकतो. भारतातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात. बिघडलेल्या राजकीय संबंधांचा सर्वाधिक परिणाम याच क्षेत्रावर होऊ शकतो. भारत-कॅनडात कुठल्या गोष्टींवर देवाण-घेवाण होते, भारतावर कितपत परिणाम होईल, जाणून घेऊया.

घटनेच्या उद्देशिकेतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळले; अधिवेशनादरम्यान गोंधळ

सीआयआयने प्रसिध्द केलेल्या अहवालात आकडेवारीसह सविस्तर माहिती देण्यात आली होती. सीआयआयने ‘फ्रॉम इंडिया टू कॅनडा : इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल टोरोंटो दौऱ्यावर असतानाच हा अहवाल जाहीर करण्यात आला होता.

भारत आणि कॅनडामधील व्यापार सुलभता आणि चांगले संबंध यामुळे भारताने तिथे मोठी गुंतवणूक केली आहे. कॅनेडियन पेन्शन फंडांनीही भारतात ५५ डॉलर अब्ज गुंतवले आहेत. भारतीय आयटी कंपन्यांचा कॅनडामध्ये मोठा व्यवसाय आहे. याशिवाय सॉफ्टवेअर, नैसर्गिक संसाधने आणि बँकिंग क्षेत्रात भारतीय कंपन्या सक्रिय आहेत. यामध्ये विप्रो आणि इन्फोसिससारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

India vs Canada: कॅनडाकडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली

कॅनडा आणि भारताच्या संबंधात तणाव सतत वाढत चालला आहे. भारतीय विद्यार्थ्यी मोठ्या प्रमाणा कॅनडामध्ये शिक्षणाला जात असतात. कॅनडामध्ये ४० टक्के परदेशी विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी कॅनडामध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. पंजाबमधून कॅनडाला जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे.

कॅनडामध्ये सध्या पंजाबचे दोन लाख विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. एका विद्यार्थ्याच्या फी चा २५ लाख रुपये खर्च होतो. तणाव आणखी वाढल्यास कॅनडा आपल्या देशातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करेल. पण त्यामुळे त्यांना फी च्या रक्केमवर पाणी सोडावे लागेल.

Parliament Special Session : महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; सोनिया गांधी म्हणाल्या…

‘फ्रॉम इंडिया टू कॅनडा: इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड एंगेजमेंट’ हा अहवाल पाहिला, तर सध्या सुरू असलेल्या कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावाचा व्यवसाय क्षेत्रावर काय परिणाम होईल? याचा अंदाज येऊ शकतो. अहवालानुसार, कॅनडामध्ये ३० भारतीय कंपन्यां असून त्यांनी देशात केलेली गुंतवणूक ४०,४४६ कोटी रुपयांची आहे.

एवढेच नाही तर, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावापूर्वी, व्यापार संबंधांबद्दलच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात असे दिसून आले आहे की, तिथे उपस्थित असलेल्या यापैकी ८४ टक्के भारतीय कंपन्यांनी भविष्यात नाविन्यपूर्णतेसाठी निधी वाढवण्याची आशा व्यक्त केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या